Powered by Blogger.

Contributors

Followers

Saturday, 23 June 2012

Tag:

गुटखा - पहिली पुडी तोंडात टाकण्यापूर्वीच हे वाचा..

तंबाखू-गुटख्याच्या व्यसनामुळे २५-३0 वय असणारे तरुणही तोंडाच्या कर्करोगाला बळी पडत आहेत, ही चिंतेची बाब आहे. जगभर कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी फक्त तीन ते चार टक्के रुग्णांना तोंडाचा कर्करोग असतो. भारतात मात्र हे प्रमाण ५0 टक्क्यांपर्यंत आहे.

FOR READ MORE CLICK HERE.     

http://is.gd/aywazu

अनिमेषच्या पत्नीने त्यांच्याच मित्रपरिवारातील एका वकील मित्राला सल्ला विचारला आहे, तिला अनिमेषपासून घटस्फोट हवा आहे.. त्यामागचे कारण आहे नवर्‍याला असलेल्या गुटख्याचे व्यसन!
अनेक वेळा समजावूनही अनिमेषची ही सवय सुटली नाही. अलीकडच्या काळात तर त्याच्या शरीरावर त्याचे दुष्परिणाम दिसायला लागले आणि कॅन्सरची प्राथमिक पायरी त्याच्या शरीरात रोवली गेली.. हे समजल्यावर तिने निर्णय घेत घटस्फोटाची चौकशी सुरू केली आहे..
हा किस्सा काल्पनिक नाही. असा प्रसंग तुमच्या आमच्या आयुष्यातही येऊ शकतो. विषयही नवा नाही; पण पुन्हा चर्चा करण्याचे कारण म्हणजे आता महाराष्ट्र सरकार यावर बंदी आणू पाहत आहे.. बंदी येईल की नाही, हा भाग पुढचा. पण या निमित्ताने पुन्हा एकदा या विषयाची ‘उजळणी’ करूया!
गेल्या वर्षी देशात या संदर्भात एक सर्वेक्षण करण्यात आले होते. त्यातील निष्कर्ष हे धक्कादायक असून, देशभरात पंधरा वर्षांखालील तब्बल ५0 लाख मुले गुटख्याच्या आहारी गेल्याचे दिसून आले होते. अन्य एका सर्वेक्षणानुसार उत्तर प्रदेशमध्ये ज्या मुलांना गुटख्याचे व्यसन लागले होते, त्यापैकी १६ टक्के मुलांमध्ये तोंडाच्या कर्करोगाची सुरुवात झाल्याचे दिसून आले होते.

FOR READ MORE CLICK HERE.     

http://is.gd/aywazu


गुटख्याची चटक लागते कशी?
तंबाखूतला सर्वात घातक घटक म्हणजे निकोटिन. तंबाखू-र्जदा- गुटखा खाल्ल्याने तोंडाच्या आतील पेशींवर तर परिणाम होतोच; परंतु त्यातील विषारी पदार्थ रक्तात पसरून सर्व शरीरावरही परिणाम होतो. गालफडात ठेवलेल्या तंबाखूतले उत्तेजक, विषारी पदार्थ असेच काही क्षणांत रक्तात पसरतात व उत्तेजन आणतात. हळूहळू याची चटक लागते; मात्र तंबाखूच्या सेवनाने येणारी उत्तेजना तात्पुरती असते. थोड्याच अवधीत तिची ‘किक’ संपते. मानसिक थकवा जाणवू लागतो. शारीरिक क्षमता कमी झाल्यासारखी वाटते. स्नायूंमध्ये शैथिल्य आल्यासारखे वाटते. हे घालविण्यासाठी पुन्हा र्जदा-गुटख्याचे सेवन केले जाते व हे दुचक्र चालूच राहते. बघता बघता माणूस व्यसनाच्या पूर्णपणे अधीन होतो.

काय होतात परिणाम?
तंबाखू खाणार्‍या व्यक्तीला सातत्याने तोंड येण्याची समस्या उद्भवते. तोंडाच्या आतील पेशी लाल होतात व त्यावर पुरळ उठते किंवा जखमा होतात. तिखट पदार्थ तर तोंडाला लावूनही चालत नाहीत. काही लोकांना तोंड उघडताना त्रास होऊ लागतो. तोंडाच्या पेशींवर पांढरे चट्टे उमटतात. त्यांना ‘ल्युकोप्लोकिया’ असे म्हणतात. या चट्टय़ांना कर्करोगपूर्व लक्षण मानले जाते. तोंडामध्ये कर्करोगाचा उव ेमपटल, ओठ, हिरड्या, जीभ, टाळू, घसा यांपैकी कोठेही होऊ शकतो. या ठिकाणी मांसल गाठी अथवा दीर्घकाळ बर्‍या न होणार्‍या जखमा दिसू लागतात.
तंबाखूमुळे तोंडाची चव जाणे, भूक मंदावणे, पचनाच्या तक्रारी यांसारखे त्रास निर्माण होऊ शकतात. तंबाखूच्या सेवनामुळे अंडाशयावर परिणाम होऊन नपुंसकत्व येऊ शकते. तंबाखूमुळे शुक्रजंतूवर अनेक परिणाम होऊ शकतात. तसेच त्यामुळे हे परिणाम पुढील पिढीतही प्रकट होऊ शकतात..
विख्यात नाटककार राम गणोश गडकरी यांच्या गाजलेल्या ‘एकच प्याला’ या नाटकात एका पात्राच्या तोंडी एक वाक्य आहे, ‘व्यसन हे एकदाच सुटते.. लागण्यापूर्वी’, नाटकातील प्रसंगाच्या अनुषंगाने उच्चारलेले हे वाक्य किती योग्य आहे, याचा आडाखा आज कोणत्याही व्यसनाच्या आहारी गेलेली व्यक्ती बांधू शकेल. परिणाम, दुष्परिणाम सर्व माहिती असूनही या व्यसनांचा पाश कसा आपल्याभोवती विणला जातो? आणि यातून येणार्‍या शेवटाकडे स्वत:ची फरफट करताना आपण दुसर्‍यांचीही फरफट करतो; पण तरीही व्यसन मात्र सोडत नाही. 

प्रमुख लक्षणो
- तोंडामध्ये लवकर बरी न होणारी व त्यातून सहजपणो रक्त येणारी जखम.
- गालामध्ये जिभेला जाणवेल अशी गाठ.
- सतत घसा खवखवणे अथवा त्यात काहीतरी अडकल्यासारखे वाटत राहणे.
- चावताना अथवा गिळताना त्रास होणो.
- जीभ व जबड्याची हालचाल करताना त्रास होणे.
- जीभ व तोंडाचा एखादा भाग जड/बधिर वाटणो.

FOR READ MORE CLICK HERE.     

http://is.gd/aywazu


 

About Nirmala

LIke this page only 18+ content but there is no nudity! If you have any complain donot Report our page just message us the problem! Otherwise lets have fun.

0 comments:

Post a Comment

Marathi Sexy Stories,Sexy story in Marathi,Hindi sexy stories,Read online sexy stories

Marathi Sexy Stories

↑ Grab this Headline Animator

 

Enter your email address:

Delivered by FeedBurner